माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला नसता, तर शिवसेनेत एवढे मोठे बंड झालेच नसते. शिवसेना खिळखिळी होण्यास उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पिंपरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत यायला हवे होते. ते आले असते तर एकनाथ शिंदे यांचे बंड झालेच नसते आणि शिवसेनेचे इतके मोठे नुकसानही झाले नसते.

हेही वाचा- “पंतप्रधान नरेंद्र मोदींशी सामना करण्याची हिंम्मत राहुल गांधी यांच्यात नाही म्हणून…”;रामदास आठवलेंची टीका

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
Ayodhya Paul and uddhav thackeray
अयोध्या पौळ यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे कल्याणच्या उमेदवारीची चर्चा; नंतर खुलासा करत म्हणाल्या…

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे आव्हान समोर आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकायची आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा-रिपाई युतीला ८२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी आम्ही शिवसेनेकडून मुंबई महापालिका हिसकावून घेणार आहे. रिपब्लिकन पक्षाला २० ते २५ जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने अद्याप चर्चा झालेली नाही. मुंबईत भाजपा-रिपाइंची सत्ता आल्यास रिपाईला उपमहापौरपद हवे आहे. अद्याप आम्हाला निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. त्यामुळे रिपाईचे उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार, हे तूर्त ठरलेले नाही.

‘राज ठाकरेंची गरज नाही’

राज ठाकरे आणि भाजपा एकत्र येतील, असे बिलकूल वाटत नाही. राज यांची आम्हाला आवश्यकता नाही. ते स्वंयभू व मोठे नेते आहेत. त्यांच्या सभांना चांगली गर्दी होते. तरीही त्यांची आम्हाला गरज वाटत नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा- पुणे: अकोले येथे किसान सभेचे राज्य अधिवेशन सुरू; ओला दुष्काळप्रश्नी तीव्र आंदोलनाचे नियोजन करणार

‘काँग्रेस म्हणजे निवडून न येणाऱ्यांचा पक्ष’

काँग्रेस पक्ष निवडून न येणाऱ्यांचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सामना करण्याचे धाडस राहुल गांधी यांच्यात नाही. राहुल गांधींच्या यात्रेला फारसा प्रतिसाद मिळत नाही. ते अमेठीत पराभूत झाले. खासदारकीसाठी केरळमधून लढावे लागले. काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या, तरी भाजपा ४०० जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल आणि नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असे रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा- “नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं…” फडणवीसांच्या विधानाचा आदित्य ठाकरेंकडून समाचार, म्हणाले…

राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. आमदार राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद खोक्याचा नसून त्यांच्या डोक्याचा आहे. खोके घेतले आहे, असे जे कोणी म्हणतात. त्यांचे डोके फिरले आहे. गुजरात पूल कोसळला, त्याची चौकशी झाली पाहिजे व दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली.