पुणे शहरातील विविध प्रश्नांबाबत बैठक आज ( २७ मार्च ) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही बैठक विशेष अर्थाने चर्चेत आली आहे. या बैठकीला कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हजेरी लावली होती. पण, बैठकीवर बहिष्कार टाकत बाहेर पडण्याचा निर्णय रवींद्र धंगेकर यांनी घेतला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “बैठक सुरू झाल्यावर पालकमंत्र्यांनी माझ्याकडं पाहिलेच नाही. बैठकीत पुण्यातील रस्ते आणि वाहतुकीबद्दल चर्चा सुरू होती. तेव्हा अचानक गणेश बिडकर तिथे आले. आजच्या बैठकीला त्यांना निमंत्रण नव्हतं. मात्र, त्यांना भाजपाचीच बैठक घ्यायची होती, नागरिकांमध्ये खुलेआम चर्चा करायला हवी होती.”

हेही वाचा : उद्धव ठाकरेंची भाजपाबरोबर पुन्हा युती होणार? राधाकृष्ण विखे-पाटलांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “नवीन युती…”

“बैठकीसाठी ६ जण निमंत्रित होतो. ही चर्चा चालू असताना मध्येच बीडकर यांनी बोलण्यास सुरूवात केली. पालकमंत्र्यांना काही समजत नाही, त्यांनाच पुण्याचं समजतं, अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. पालकमंत्र्यांपेक्षा तज्ञ्ज मंडळी आहेत. त्यामुळे आपण निघून आलेल महत्वाचं आहे,” अशी नाराजी रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “…म्हणून भाजपात प्रवेश केला”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला हर्षवर्धन पाटलांचं प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पालकमंत्र्यांना अशीच बैठक घ्यायची होती, तर नागरिकांत घ्यायला पाहिजे. पुण्यात अनेक तज्ञ्ज मंडळी आहेत. बीडकर नगरसेवक नाहीत, कोणत्या पदावर नाहीत. तरीही अशा बैठकीला अशी लोक येत असतील, तर आम्ही आमदार होऊन का त्याठिकाणी बसायचं. म्हणून बैठकीतून बाहेर पडलो,” असं रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं.