पुणे सहकारी बँक आणि डिफेन्स अकाउंट्स को-ऑपरेटिव्ह बँक या दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. यामुळे या बँकांना आता नव्याने कर्ज देता येणार नाही. याचबरोबर ठेवीदारांनाही त्यांच्या खात्यातील ठेवी काढण्यावर मर्यादा आली आहे. हे निर्बंध १० मार्चपासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू झाले आहेत.

हेही वाचा >>>पुणे : वाहतूक नियमनाऐवजी दंड वसुली करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय नव्याने कर्ज देता येणार नाही. याचबरोबर नवीन गुंतवणूक, ठेवी स्वीकारणे यावरही बंधन असणार आहे. या बँकांना त्यांच्या कोणत्याही मालमत्ता विकता येणार नाहीत. बँकेच्या पात्र ठेवीदारांसाठी ठेवींवर ५ लाख रुपयांपर्यंतचे कमाल विमा संरक्षण असणार आहे. रिझर्व्ह बँकेने केलेली ही कारवाई म्हणजे बँकेचा परवाना रद्द केलेला नाही. बँकांची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांच्यावरील निर्बंध हटवण्यात येतील.

हेही वाचा >>>पुणे: लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची पावणेतीन लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे सहकारी बँकेच्या खातेदारांना बचत अथवा चालू खात्यातून १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. याचवेळी डिफेन्स अकाउंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना बचत अथवा चालू खात्यातून ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. बँका या निर्बंधांसह त्यांचे दैनंदिन कामकाज पार पाडू शकतील. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून आल्यास सहा महिन्यांच्या आधीही हे निर्बंध रिझर्व्ह बँकेकडून शिथिल केले जाऊ शकतात.