लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मध्यप्रदेशात लाडली योजनेची चर्चा सर्वत्र होती. त्यातच शिराजसिंह चैहान मामाजींचे नेतृत्व मध्यप्रदेशातील निवडणुकीतील महत्त्वपूर्ण ठरले. राजस्थानाबाबत तूर्त सांगता येणार नाही. तेलंगणामध्ये रेवांत रेड्डी यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला यश मिळाले, अशी प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चार राज्यातील निवडणूक निकालावर दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित गावरान खाद्य महोत्सवाला सुप्रिया सुळे यांनी रविवारी भेट दिली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. विजयाचे ठोस असे कारण सांगता येत नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये पाच वर्षांपूर्व काँग्रेसला विजय मिळाला होता. भाजप पराभूत झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळे दिसले. सध्या राजस्थान आणि मध्यप्रेदशात भाजप जिंकले असेल तरी त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत राहीलच असे नाही, असे सुळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या ॲड. बालाजी किल्लारीकर यांनी का घेतली शरद पवारांची भेट?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यप्रदेशातील लाडली योजनेची मोठी चर्चा झाली होती. शिवराजसिंह यांना ‘मामाजी’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे नेतृत्व आणि योजनेची चर्चा मध्यप्रदेशातील विजयात महत्त्वूपूर्ण ठरली. राजस्थानमधील भाजपच्या विजयाबाबत विश्लेषण करावे लागले. काँग्रेसच्या रेवांत रेड्डी यांनी ज्या प्रकारे आघाडी घेतली त्यावरून त्यांचे नेतृत्व तेलंगणासाठी उपयुक्त ठरले. बीआरएसचे केसीआर यांनीही तेलंगणामध्ये चांगल्या योजना राबविल्या होत्या. मात्र तेथे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही तर मध्यप्रदेशात योजनेचा परिणाम झाला. योजनांचा प्रभाव आणि मतांची टक्केवारी पूर्ण निकाल हाती आल्यानंतर स्पष्ट होईल, असे सुळे म्हणल्या.