इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन-२०२३’ मध्ये तब्बल ३० हजार ३७० हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’चे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.

‘‘आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित न करता स्वच्छ ठेवावी’’ हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी- चिंचवड नगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस विभाग आणि इतर पर्यावरणप्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला. पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल ३० हजार ३७० हून अधिक सायकलपटूंनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा – कोल्हापूरचा उत्तम पाटील ठरला ‘अर्थ मॅरेथॅान’चा विजेता, मॅरेथॉनमध्ये केनियाच्या धावपटूंचे निर्विवाद वर्चस्व

यावेळी ‘रिव्हर सायक्लोथॉन टीम’ने ‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. त्याचे प्रमाणपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे- पाटील, कुस्तीपटू नरसिंह यादव यांच्यासह महापालिका, पोलीस अधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सायलिंगसाठी काम करीत आहे. प्रशासनाला यावर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये ‘रिव्हर सायक्लोथॉन’चे योगदान महत्त्वाचे आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी रिव्हर सायक्लॉथॉनची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आमदार महेश लांडगे यांचे अभिनंदन करतो. सर्व संस्था, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तींमुळे पिंपरी- चिंचवडचे नाव जगभरात करणारे आणि वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या सायकलपटूंचे कौतूक करतो. आरोग्यदायी जीवनासाठी सायकलपटूंनी सातत्य ठेवावे. ५, १५ आणि १५ किलोमीटर स्पर्धा होत आहेत. पुढील वर्षी ३५ किमी लांब सायकल रॅली स्पर्धा करावी, अशी अपेक्षाही चौबे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘मामांजींचे नेतृत्व, लाडली योजनेचे निवडणुकीत यश…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार महेश लांडगे म्हणाले, नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी अविरत श्रमदान आणि सायकल मित्र संघटनेच्या पुढाकाराने ‘रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित करण्यात येते. जर्मनीचे रेकॉर्ड तोडण्यासाठी ६० देशांनी प्रयत्न केले. मात्र, भारताने हे रेकॉर्ड मोडले. या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण आणि फिटनेसचा संदेश देण्यात येत आहे. या रॅलीला ऐतिहासिक प्रतिसाद दिला. याबद्दल सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमींचे आभार व्यक्त करतो.