लोणावळा : लोणावळ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील २४ तासांत लोणावळ्यात तब्बल २१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रेकॉर्डब्रेक पाऊस मागील २४ तासांत लोणावळ्यात झाला. लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याची चांगलीच संधी मिळाली. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता पर्यटकांची पावले लोणावळ्यात वळू लागली आहेत.

पर्यटकांच्या आवडीच पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यात गेल्या २४ तासात तब्बल २१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जो यावर्षीचा रेकॉर्डब्रेक पाऊस आहे. आत्तापर्यंत लोणावळ्यात १ हजार ४८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसांपर्यंत १ हजार १९० मिलिमीटर पाऊस झाला होता.

हेही वाचा…‘सारसबाग’ प्रकरणाचे सांस्कृतिक शहरात सामाजिक-राजकीय पडसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस कोसळला आहे. धुवादार पाऊस झाल्याने लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट इथे आधीच गर्दी असते. पर्यटकांनी स्वतः ची आणि दुसऱ्याची काळजी घेऊन पर्यटन करावे. अस आवाहन वारंवार लोणावळा पोलीस करत आहेत.