पुणे : ज्येष्ठ नाट्यकर्मी, निर्माता, दिग्दर्शक विवेक वाघ यांचे खासगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. त्यांच्या माहितीपटाला २०२१ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

विवेक वाघ दीर्घकाळापासून पुण्यातील रंगभूमी, चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. व्यावसायिक नाट्यनिर्मितीसह निर्मितीसह चेकमेट या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते होते. तसेच माझं भिरंभिरं, सिद्धांत अशा चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित जक्कल या शोध माहितीपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या माहितीपटावर आधारित जक्कल वेब मालिकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा…पुणे : रानभाजी वाघाटीचा यंदा उच्चांकी दर, किलोला एक हजार रुपये भाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याशिवाय कोकणातील कातळशिल्पांवर आधारित ‘स्टोन अँड एज’ हा माहितीपट त्यांनी नुकताच केला आहे. वाघ यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. वाघ यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.