scorecardresearch

Premium

पुणे : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जणांची सुटका

अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टचा दरवाजा वाकवला. लिफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून लिफ्ट सुरू केली. लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन महिलांसह सहाजणांची सुटका केली.

people trapped Sassoon hospital lift
पुणे : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जणांची सुटका (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीतील लिफ्टमध्ये शुक्रवारी दुपारी सहाजण अडकले. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली.

ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील लिफ्टमधून दुपारी बाराच्या सुमारास रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी तळमजल्यावर निघाले होते. लिफ्ट चौथ्या आणि पाचव्या मजल्यांच्या मधोमध अडकली. लिफ्टमधील नागरिकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी लिफ्ट तळमजल्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दालाला याबाबतची माहिती दिली.

one labourer killed 4 injured in wall collapse in nalasopara
नालासोपाऱ्यात भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू; ४ मजूर गंभीर जखमी
yavatmal theft marathi news, jewellery of rupees 30 lakhs stolen yavatmal marathi news, raymond company s housing colony yavatmal
‘रेमंड’मधील अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चक्क ३० लाखांचे दागीने लंपास; सुरक्षा भेदून चोरी
Maruti Suzuki Baleno
६.६६ लाखाच्या मारुतीच्या ‘या’ ६ एअरबॅग्स असलेल्या कारसमोर सर्व पडतात फिक्या? १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ३० किमी
Chandrapur, Murder Case, Friend Killed, Buried, dumping yard, five arrested,
चंद्रपूर : मित्राची हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरला, पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा – पुणे : ‘स्वच्छ’ला पुन्हा तात्पुरती मुदतवाढ; शहरातील कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

हेही वाचा – केळीच्या विम्यासाठी दहा हजार बोगस अर्ज; जळगावमधील प्रकार

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. लिफ्टमध्ये अडकलेले सहाजण घाबरले होते. जवानांनी लिफ्टचा दरवाजा वाकवला. लिफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून लिफ्ट सुरू केली. लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन महिलांसह सहाजणांची सुटका केली. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके, प्रशांत गायकर, सचिन चव्हाण, ओंकार साखरे, सुनिल नामे, केतन नरके, परेश जाधव, अक्षय शिंदे आदी मदतकार्यात सहभागी झाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rescue of six people trapped in sassoon hospital lift pune print news rbk 25 ssb

First published on: 03-11-2023 at 16:18 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×