पुणे : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) काही व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर उर्वरित अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ११ ते १८ जुलै या कालावधीमध्ये बहुतांश सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असून, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया येत्या १४ जुलैपासून सुरू होणार आहे.

एमसीए, पाच वर्षे विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. आता हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ११ जुलैपासून, एमबीए, औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्म प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १२ जुलैपासून, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि द्वितीय वर्ष औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अनुक्रमे १५ आणि १६ जुलैपासून सुरू होणार आहे. तर उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील तीन वर्षे विधी अभ्यासक्रम, बी.एड, एम.एड, बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ११ ते १३ जुलै या कालावधीत सुरू केली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली.

हेही वाचा – पन्नास वर्षांपूर्वीचा साधू वासवानी पूल इतिहासजमा, पुलाच्या पाडकामाला प्रारंभ; कोरेगाव परिसरातील वाहतुकीची कोंडी सुटणार

हेही वाचा – भाजपची पुण्यातील चिंतन बैठक लांबणीवर, आता २१ जुलै रोजी नियोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एम. फार्म), औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी. फार्म), औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्म.) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेबाबत लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अधिक माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.