पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेलेल्या पुण्यामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आहे.  एरंडवणा परिसरातील या मंडळाचे ‘रिद्धी-सिद्धी महिला गणेश मंडळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. मंडळाकडून गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून, महिलांनी सुरू केलेले हे पहिलेच गणेश मंडळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची केवळ देशभरातच नाही तर परदेशातही चर्चा असते.  गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सर्वत्र जल्लोष आणि भक्तिमय वातावरण असते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजकार्य करतानाच काय चांगले करता येईल, या विचाराने आम्ही महिलांनी एकत्र येत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे मंडळाच्या अध्यक्ष गायत्री भागवत आणि कार्याध्यक्ष सुवर्णा भरेकर यांनी सोमवारी सांगितले.

हेही वाचा : गणेशभक्तांच्या भावनांचा आदर करा ; पालिका व पोलिसांच्या बैठकीत सूचना

मंडळाच्या उपाध्यक्ष प्रमिला देवकुळे आणि सचिव ॲड. चित्रा जामखडे या वेळी उपस्थित होत्या. भागवत म्हणाल्या, की देखाव्याच्या माध्यमातून समाजासमोर आणि विशेषतः महिलांना विविध प्रकारे सज्ञान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गणेशोत्सवात कडक बंदोबस्त ; उत्सवाच्या कालावधीत साडेसात हजार पोलीस तैनात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांच्या विविध समस्या, त्यांच्यावर होणारे अत्याचार-अन्याय यासंदर्भात जागृती, महिलांसाठीच्या वेगवेगळ्या शासकीय योजना, वेगवेगळे कायदे अशा अनेक विषयांवरील माहितीचा प्रसार गणेशोत्सवातील दहा दिवसात केला जाणार आहे. तसेच, गरजू महिलांसाठी छोटे उपक्रम राबविणार आहोत.