पुण्यातील रास्ता पेठ परिसरात तीन दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एक लाख ८४ हजारांची रोकड लांबवली आहे.
हेही वाचा- पुणे : कसबा पोटनिवडणूक बंदोबस्तात गुन्हे शाखेने पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पकडले
रास्ता पेठेतील माळी महाराज मंदिर रस्त्यावर शामियाना काॅम्प्लेक्स सोसायटीत गणक एनएक्स गृहोपयोगी वस्तुचे दुकान आहे. या दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी एक लाख ७४ हजारांची रोकड लांबविली. याच परिसरातील किशोर खीमशेरा यांच्या सॅनिटरी वेअर दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी एक लाख ६०० रुपयांची रोकड चोरुन नेली. महेंद्र माली यांच्या आईस्क्रीम दुकानातून सहा हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.