पिंपरी- चिंचवड: आमदार रोहित पवारांनी कर्जत- जामखेडमध्ये अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरले. रोहित पवार अक्षरशः अधिकाऱ्यावर संतापले होते. रोहित पवारांचा हा संतापलेला अवतार बघून काका अजित पवारांनी पुतण्याला मोलाचा सल्ला दिला आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आमदार रोहित पवार हे कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. आज त्यांच्या मतदारसंघात आयोजित आमसभेत नगरपालिकेच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत सर्वसामान्य नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला. यावरून संतापलेल्या रोहित पवारांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं, रोहित पवार हे संतापले होते. आत्तापर्यंत गोट्या खेळत होतात का? अशा शब्दात अधिकाऱ्याला झापल.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांना मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “कुणी कस वागायचं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु, योग्य पद्धतीने वागलं पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी कस वागायचं हे शिकवलेलं आहे. त्या रस्त्यावर गेल्यास त्याचा उपयोग होईल.” असा सल्ला काका अजित पवारांनी पुतण्या रोहित पवार ला नाव न घेता अप्रत्येक्षरीत्या दिला आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.