पुणे : पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेला रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. अऱ्हानाने त्याच्या कर्ज खात्यातून काढलेल्या सात कोटी ६७ लाख रुपयांच्या रकमेचा कसा विनयोग केला, याबाबतची माहिती दिली नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. न्यायालायने अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ केली.

अऱ्हानाच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील ॲड. मारुती वाडेकर यांनी बाजू मांडली. अरहानाच्या खात्यात फरमान गुरमीत याच्या खात्यातून दोन कोटी ८० लाख रुपये वर्ग झाले आहेत. त्यापैकी ८१ लाख ८० हजारांची रक्कम अऱ्हानाच्या खात्यातून कर्जफेडीसाठी वर्ग करण्यात आली आहे. अऱ्हानाने ७०लाख रुपये शीतल सूर्यवंशी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या खात्यात वर्ग केले आहेत.

हेही वाचा…उष्माघात प्रथमोपचार औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासात कर्जदार किशोर चव्हाण याच्या मुदत कर्ज खात्यातील रक्कम अऱ्हानाच्या खात्यात वर्ग झाल्याचे दिसून आले आहे, असे सरकारी वकील ॲड. वाडेकर यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अऱ्हानाने रकमेचा विनियोग कसा केला, याची नेमकी माहिती मिळाली नाही. तपासात अऱ्हाना सहकार्य करत नाही. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत वाढविण्याची विनंती ॲड. वाडेकर यांनी केली. न्यायालयाने अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत बुधवारपर्यंत (१० एप्रिल) वाढ करण्याचे आदेश दिले.