शहरांत पालख्याने आगमन होणार असल्याने २२ जून रोजी वाहन चालविण्याच्या परवान्याच्या चाचणीसाठी या दिवशी पूर्वनियोजित वेळ मिळालेल्या उमेदवारांच्या तारखेमध्ये बदल करण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांची चाचणी २२ जूनऐवजी २५ जून रोजी घेतली जाईल, असे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

वाहन चालविण्याचा पक्का परवाना देण्यासाठी पुणे प्रादेशिक परविहन कार्यालयाकडून आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर मोटार सायककल, रिक्षा चालविण्याची चाचणी घेतली जाते. कासारवाडी येथील आयडीटीआरच्या चाचणी मार्गावर मोटार चालविण्याची चाचणी घेण्यात येते. यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुणे शहरामध्ये २२ जूनला आगमन होणार आहे. पालखीच्या आगमनामुळे शहरातील काही रस्ते बंद ठेवण्यात येणार असल्याने चाचणीच्या नियोजित वेळा बदलण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ जूनला परवान्याच्या चाचणीसाठी पूर्वनियोजित वेळ मिळालेल्या उमेदवारांची चाचणी २५ जूनला होणार आहे. उमेदवारांनी शिकाऊ परवाना अर्ज, शिकाऊ परवाना आणि पक्क्या परवान्यासाठी केलेल्या अर्जासह २५ जूनला नियोजित ठिकाणी चाचणी परीक्षेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.