दिवाळीपूर्वी रूबी हॉल क्लिनिक व्यवस्थापनातर्फे रुग्णालयाच्या नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनेबरोबर दीर्घ मुदतीचा वेतन करार करण्यात आला आहे. हा करार जुलै २०२५ पर्यंत असून या करारामध्ये कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेतन लाभ तसेच वैद्यकीय लाभ मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे.नवीन वेतन कराराअंतर्गत सर्व पात्र कर्मचाऱ्यांना विविध भत्त्यांमध्ये वाढ, वेतनवाढ देण्यात आली आहे. त्याबरोबरच कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून पात्र व्यक्तींसाठी वैद्यकीय लाभांची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘तुम्ही न्यायालयात केस बांधत जाऊ नका’, पुण्यातील महिला वकिलांना नोटीस? नव्या वादाला तोंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे पती किंवा पत्नी यांना देखील सेवानिवृत्तीनंतर औषधे आणि वैद्यकीय लाभांसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. कामगार संघटनेकडून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेतला असून कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या योगदानातून रोलिंग रिटायरमेंट फंड सुरू करून प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला वैधानिक देय रकमेव्यतिरिक्त भरघोस रक्कम देण्याचा निर्णयही या करारान्वये घेण्यात आला आहे.