मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून ‘सुरक्षा’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारपासून (एक डिसेंबर) या मोहिमेस सुरुवात करण्यात येणार आहे.मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची १२ पथके गस्त घालणार आहेत. द्रुतगती आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘सुरक्षा’ ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पुढील सहा महिने या दोन्ही महामार्गावर सहा पथके आणि १५ अधिकारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.

हेही वाचा >>>पुणे: कोथरुडमधील पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार; लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक

Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

अपघातग्रस्त ठिकाणांची (ब्लॅकस्पाॅट) पाहणी करण्यात येणार असून सुरक्षेच्या दृष्टीने अपघातग्रस्त ठिकाणी वाहनचालकांना माहिती देण्यासाठी फलक लावण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. अजित शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. द्रुतगती मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. दोन्ही महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत ध्वनिवर्धकावरून वाहनचालकांना आवाहन करण्यात येणार आहे. टोलनाक्यावर ध्वनिवर्धकाद्वारे वाहनचालकांना वाहतूकविषयक नियमांची माहिती देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी इंटरसेप्टर वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. उजव्या मार्गिकेत कमी वेगाने जाणारे ट्रक, बस, कंटेनरचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

महामार्गावरील ८० टक्के अपघात वाहनचालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. भरधाव वेग, निष्काळजीपणा, बेफिकिरी, नियम न पाळल्यामुळे अपघात झाल्याचे निरीक्षण आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास गंभीर स्वरूपाचे अपघात रोखणे शक्य होईल.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त