संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी आळंदी देवस्थानकडून काही निर्णय घेण्यात आले आहेत. प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं देवस्थाने ठरवलं आहे. तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे.

माऊलींच्या पालखीच दुपारी चारच्या सुमारास प्रस्थान आहे. ते वेळेत व्हावं आणि शांततेत पार पडावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटल आहे. गेल्यावर्षी प्रस्तावनावेळी मंदिरात १७ हजार वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. तीन दिवसांवरती माऊलींचा पालखी सोहळा येऊन ठेपला आहे. यावर्षी दिंडीतील वारकऱ्यांवर मर्यादा घालण्यात आली आहे.

हेही वाचा >>> सखाराम महाराज संस्थान पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; १३६ वर्षांची परंपरा

दिंडीतील केवळ ७५ च वारकऱ्यांना आत घेऊन जाण्याचं आवाहन आळंदी देवस्थान कडून करण्यात आल आहे. दरवर्षी प्रस्तावनावेळी मोठी गर्दी होते. मुळात मंदिरात ४ हजार ४८० लोक थांबतील एवढीच जागा आहे, तसा अहवाल आळंदी देवस्थान यांच्याकडे आहे. परंतु, गेल्या वर्षी प्रस्तावनावेळी १६ ते १७ वारकरी उपस्थित होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ शकते यासाठी यावर्षी दिंडीतील केवळ ७५ वारकऱ्यांनाच आत मध्ये प्रवेश देणार असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले आहे. माऊलींच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होताच नगर प्रदीक्षासाठी उर्वरित वारकरी आपापल्या दिंडीमध्ये सहभागी होऊन मंदिरात येऊ शकतात. अस विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रस्थानावेळी मंदिरात ४७ प्रमुख दिंड्या असतात..

माऊलींच्या पालखीच्या प्रस्तावनावेळी दरवर्षी ४७ प्रमुख दिंड्या मंदिरात असतात. टाळ मृदुंगाच्या गजरात ते माऊलींच्या प्रस्थानात सहभागी होतात. परंतु, यावर्षी ४७ दिंड्यातील प्रत्येक दिंडी मधील केवळ ७५ जणांनाच आत येण्यासाठी परवानगी असेल. यामुळे मंदिरातील गर्दी आटोक्यात येऊन प्रस्थान वेळेवर होईल असं सांगण्यात येत आहे.