पुणे: नितीश कुमार यांनी राजदबरोबरची महाआघाडी तोडून बिहारमध्ये भाजपाबरोबर एनडीएचं सरकार स्थापन केले आहे.नितीश कुमार यांनी रविवारी दुपारी राजभवनात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.त्यानंतर काही तासात नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावरून विरोधकांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्या सर्व घडामोडी दरम्यान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे पुणे दौर्‍यावर कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाला आले होते.त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधत अनेक प्रश्नावर उत्तर देत भूमिका देखील मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांच नाव आघाडीवर होते.पण याच नितीश कुमार यांना भाजप सोबत घेऊन गेली आहे.त्या प्रश्नावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, तुमच्याकडे चुकीची माहिती आहे.भाजपने काही दिवसापूर्वीच सांगितले होते की, नितीश कुमार आमच्या दारात हात जोडत आले.तर भाजप किंवा एनडीएमध्ये घेणार नाही. अशा प्रकारची भूमिका भाजपकडून मांडण्यात आली होती.एकवेळ मरण पत्करण, पण भाजपच्या दारात जाणार नसल्याची भूमिका नितीश कुमार यांनी देखील मांडली होती.या भूमिका पाहिल्यावर दोन्ही खेळाडूंची मानसिक स्थिती बरोबर नाही.तसेच या दोन्ही खेळाडूंना विस्मरणाचा झटका आलाय,त्यामुळे त्यांनी खेळ खेळू नये,असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजप नेत्यावर त्यांनी टीका केली.

हेही वाचा >>>पंतप्रधानांचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था करा, शिक्षण विभागाचा आदेश

तसेच ते पुढे म्हणाले की, कबड्डी हा खेळ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता खेळ होता.तसेच शरद पवार यांनी देखील कबड्डी आणि कुस्ती क्षेत्रात मोठ काम केले आहे. शिवसेना असेल किंवा पवार साहेबांचा संघ असेल, काँग्रेसचा संघ असेल निवडणुका आल्यावर,या महाराष्ट्रामध्ये मैदान कोण मारणार,तर २०२४ च मैदान आम्हीच मारणार आणि त्याही पुढच मैदान आम्हीच मारणार, तसेच आम्ही पुढील संघ केव्हा मैदानात येतोय याची वाट पाहतोय.मात्र ते समोर येण्याच टाळत आहे. महापालिका निवडणुका घ्या ना, आम्ही मैदानात उभेच आहोत, तुम्ही कधी या,अशी भूमिका मांडत महायुतीवर त्यांनी निशाणा साधला.

तसेच ते पुढे म्हणाले की, कबड्डी खेळात खिलाडूवृत्ती पाहण्यास मिळते.पण सध्याच्या राजकारणामधून खिलाडूवृत्ती संपवलेली आहे. हार जीत होत असते.पण आजच्या सारख सुडाच, बदला घेण्याच राजकारण अशा प्रकारच राजकारण महाराष्ट्रामध्ये कधीच घडल नव्हत, अशी भूमिका मांडत पुन्हा एकदा भाजप नेत्यावर त्यांनी टीका केली.

हेही वाचा >>>भारतीय शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; कृष्णविवराजवळून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरण रहस्याचा केला उलगडा

इम्तियाज जलील आणि भाजपची हातमिळवणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी वादग्रस्त विधान केले आहे.त्याबद्दल संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, इम्तियाज जलील आणि भाजपची हातमिळवणी आहे.त्यांनी बोलायच (इम्तियाज जलील) भाजपने प्रश्न विचारायचे,तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसापूर्वी नाशिक येथे आले होते.तर उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घरी जाऊन आले.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी जाऊन यायला हवे होते.त्याच बरोबर आम्ही २६ जानेवारी रोजी वाट पाहत होतो की,स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होईल.पण यंदाचा भारतरत्न बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना जाहीर करण्यात आला. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes bihar chief minister nitish kumar and bjp leader pune svk 88 amy
First published on: 28-01-2024 at 21:32 IST