लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हमाल मापाडी मतदारसंघातून संतोष नांगरे विजयी झाले. नांगरे यांना ८८८ मते मिळाली.

या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र चोरगे, गोरख मेंगडे, संजय उंद्रे, गोपाळ दसवडकर यांना पराभूत करुन नांगरे विजयी झाले. हमाल, मापाडी मतदार संघातील एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. एकुण दोन हजार सात मते होते. त्या पैकी एक हजार ८०२ मतदारांनी मतदान (८९.७९ टक्के) केले. त्यापैकी एक हजार ६१६ मते वैध ठरली. हमाल- मापाडी मतदारसंघात नांगरे यांनी सर्वाधिक मते मिळवली. या मतदार संघातील अन्य पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- राजेंद्र चोरघे-४०३, गोरख मेंगडे-३१४, संजय उंद्रे- ८, गोपाळ दसवडकर- ३

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.