scorecardresearch

Premium

पुण्यातील एका कार्यकर्त्याचा असाही विक्रम…

नियमित रक्तदान करणाऱ्या यादवाडकर यांनी नुकतेच तब्बल १७५ वे रक्तदान करून ससून रक्तपेढीमध्ये विक्रम नोंदवला.

Sarang Yadwadkar set a record in Sassoon Blood Bank by 175th blood donation
वयाची ६५ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांनी केलेले रक्तदान १७५वे ठरले.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने आवाज उठवण्यासाठी सारंग यादवाडकर यांची ओळख आहे. मात्र त्यांची आता आणखी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नियमित रक्तदान करणाऱ्या यादवाडकर यांनी नुकतेच तब्बल १७५ वे रक्तदान करून ससून रक्तपेढीमध्ये विक्रम नोंदवला.

Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Controversy in Ambad
अतिक्रमित प्रार्थनास्थळ हटवल्याने अंबडमध्ये वाद
Minor girl molested in residential school in Rawet Pimpri Pune news
पिंपरी: रावेतमध्ये निवासी शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संचालकासह माजी विद्यार्थिनी अटकेत
How much donation did Ram Mandir receive
रामलल्लाचा दररोज नवनवा विक्रम, ११ दिवसांत २५ लाख भाविक दर्शनासाठी पोहोचले; ‘इतके’ कोटी मिळाले दान

यादवाडकर हे पेशाने वास्तुविशारद आहेत. पुण्यातील पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत असतात. त्यामुळे पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते म्हणून त्यांची पुण्यात ओळख आहे. मात्र त्याशिवाय ससून रुग्णालय रक्तपेढी येथे गेल्या ४५ वर्षांपासून नियमितपणे दर तीन महिन्यांनी रक्तदान करतात. वयाची ६५ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांनी केलेले रक्तदान १७५वे ठरले. यादवाडकर यांच्या रक्तदानाच्या या विक्रमाची दखल घेण्यासाठी ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ससून रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. लीना नकाते, डॉ. सोमनाथ खेडकर, समाजसेवा अधीक्षक विभागाचे प्रमुख डॉ. शंकर मुगावे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-पादचारी दिनानिमित्त पीएमपीच्या आज जादा गाड्या; दर तीस मिनिटांला गाडी, पीएमपीच्या संचलनात बदल

नियमित रक्तदानाविषयी यादवाडकर म्हणाले, की नुकतेच मी १७५वे रक्तदान केले. मागे वळून पाहताना मला खूप समाधान वाटते. मात्र पुढे पाहताना मला दुःख वाटते. कारण वयाची ६५ वर्षे झाल्याने आता मला रक्तदान करता येणार नाही. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, की जास्तीत जास्त वेळा रक्तदान करा. रक्तदान केल्यामुळे काहीही नुकसान होत नाही, धोका होत नाही, उलट फायदाच होतो, समाजाला प्रचंड फायदा होतो. आपल्या रक्तदानामुळे गरज असलेल्यांना रक्त मिळते. तसेच आपल्याला अतिशय मोठे समाधान मिळते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sarang yadwadkar set a record in sassoon blood bank by 175th blood donation pune print news stj 05 mrj

First published on: 10-12-2023 at 21:55 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×