ससून रुग्णालयात सलाइन आणि इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वस्तूंच्या पुरवठादारांकडून पुरवठा होण्यास वेळ लागल्यामुळे रुग्णालयातर्फे पिंपरी-चिचवड पालिकेकडे सलाइन तसेच इंजेक्शनच्या एकूण दहा हजार बाटल्यांची मागणी करण्यात आली आहे.
यात ‘आयव्ही नॉर्मल सलाइन’ तसेच ‘आयव्ही मेट्रोनिडॅझोल’ या इंजेक्शनच्या प्रत्येकी पाच हजार बाटल्यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेने रुग्णालयास या वस्तू पुरवण्याचे मान्य केले आहे. सध्या रुग्णालयात सलाइनचा तुटवडा नसल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डी. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सलाइन पुरवठादारांनी पुरवठा न केल्यामुळे काही दिवसांनी रुग्णालयात सलाइनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी ही पर्यायी सोय करण्यात आली आहे. सलाइनची ही मागणी कर्ज तत्त्वावर करण्यात आली आहे. सलाइन व औषधांचा तुटवडा भासल्यास रुग्णालय स्थानिक पातळीवरील पुरवठादारांकडून या वस्तू खरेदी करते. मात्र सध्या सलाइनसाठी स्थानिक पुवठादारांकडून खरेदी करण्यात आलेली नाही.’’
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2013 रोजी प्रकाशित
सलाइनसाठी ससून पिंपरी-चिंचवड पालिकेच्या दारी
सलाइन आणि इंजेक्शन वस्तूंच्या पुरवठादारांकडून पुरवठा होण्यास वेळ लागल्यामुळे रुग्णालयातर्फे पिंपरी-चिचवड पालिकेकडे सलाइन तसेच इंजेक्शनच्या एकूण दहा हजार बाटल्यांची मागणी करण्यात आली आहे.

First published on: 18-09-2013 at 02:37 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sassoon request pcmc for supply of saline