scorecardresearch

पुणे : चंद्रमोहन कुलकर्णी यांना सत्यजित रे पुरस्कार जाहीर

जागतिक चित्रपटसृष्टीच्या नभांगणात आपल्या प्रतिभेने तळपणारे सत्यजित रे यांच्या चित्रपटांची दखल घेतल्याशिवाय चित्रपटाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.

पुणे : चंद्रमोहन कुलकर्णी यांना सत्यजित रे पुरस्कार जाहीर
( प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी )

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि सत्यजित रे यांची जन्मशताब्दी असे दुहेरी औचित्य साधून बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना सत्यजित रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि फिल्मसिटीचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर यांनी सांगितले.

जागतिक चित्रपटसृष्टीच्या नभांगणात आपल्या प्रतिभेने तळपणारे सत्यजित रे यांच्या चित्रपटांची दखल घेतल्याशिवाय चित्रपटाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. रे हे कथालेखक, संगीतकार, संकलक आणि चित्रकारही होते. चित्रकलेला माणसांशी जोडत जगण्यातून मानवी स्वभावाची गुंफण करीत जीवनाची सुंदर चित्रे चितारणारे किमयागार चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली आहेत. त्यामुळे कुलकर्णी यांना सत्यजित रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satyajit ray award announced to chandramohan kulkarni pune print news amy

ताज्या बातम्या