सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन अस्तित्वात आलेल्या अधिसभेची पहिली सभा शनिवारी (११ फेब्रुवारी) होणार आहे. या सभेत २०-२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला जाणार असून, अधिसभेसाठी विद्यापीठ परीक्षा, शैक्षणिक वेळापत्रक, विद्यार्थ्यांसाठीच्या योजना या संदर्भातील विविध ठरावांसह विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात अधिसभा आणि विद्याशाखेच्या महिला सदस्यांसाठी मोती रंगाच्या साडीचा समावेश करावा, अधिसभा सदस्यांची वेगळी ओळख दिसण्यासाठी स्वतंत्र बॅज द्यावा अशा ठरावांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांना सात वर्ष सक्तमजुरी; विशेष न्यायालयाकडून चोरट्यांना १५ लाखांचा दंड

काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या अधिकार मंडळांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. यंदा पहिल्यांदाच अधिसभा निवडणुकीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते. त्यात भारतीय जनता पक्षाशी संबंधितांच्या विद्यापीठ विकास मंचाच्या बहुतांश उमेदवारांनी विजय मिळवला. त्यानंतर राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक, व्यवस्थापन परिषद, अभ्यास मंडळे आदी प्रक्रिया पूर्ण करून आता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. गेल्यावर्षी ७० कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामुळे यंदा अर्थसंकल्पातील तूट कमी होणार का हा प्रश्न आहे. गेले वर्षभरापासून विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त असल्याने प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही अर्थसंकल्पीय अधिसभा होणार आहे.

हेही वाचा >>> खत खरेदी- जात प्रकरणावर संसदेत आवाज उठवणार- सुप्रिया सुळे

संलग्न महाविद्यालयातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांना ६० रुपये प्रति तास या दराने मानधन द्यावे, ऑलिम्पिक दर्जाच्या क्रीडा संकुलात मिनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे ठराव अधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी मांडले आहेत. केंद्र सरकारच्या शून्य कचरा नियमावलीचा उपयोग करून विद्यापीठात १ एप्रिलपासून शून्य कचरा कार्यक्रम करण्याचा ठराव डॉ. राजेश मणेरीकर यांनी मांडला आहे. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात अधिसभा आणि विद्याशाखेच्या महिला सदस्यांसाठी मोती रंगाच्या साडीचा समावेश करावा, अधिसभा सदस्यांची वेगळी ओळख दिसण्यासाठी स्वतंत्र बॅज द्यावा हे ठराव अपर्णा लळिंगकर यांनी मांडले आहेत.

हेही वाचा >>> गुलटेकडीतील ओैद्योगिक वसाहतीत दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’

विद्यापीठाच्या विभागांमध्ये पीएच.डी. विद्यार्थ्यांप्रमाणे संलग्न महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे लाभ मिळावेत, शैक्षणिक वेळापत्रक आणि परीक्षा यातील विस्कळीतपणा दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत डॉ. वैभव दीक्षित यांनी ठराव मांडले आहेत. विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि ई ट्रान्सस्क्रीप्ट लवकर मिळावेत असा ठराव ॲड. ईशानी जोशी यांनी, तर परीक्षा झाल्यावर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याबाबत डॉ. अपूर्व हिरे यांनी ठराव मांडला आहे. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुट्यांची स्वतंत्र परिपत्रके प्रसिद्ध केल्याने गोंधळ होत असून, एकच परिपत्रक प्रसिद्ध करण्याची मागणी डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी केली आहे.

हेही वाचा >>> प्राधिकरणातील जागा मालकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ वाटपाची प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करणार; शंभुराज देसाई यांची विधानसभेत माहिती

पहिले कुलगुरू डॉ. मुकुंद जयकर यांचे स्मृतिशिल्प बसवण्याची मागणी विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षात पहिले कुलगुरू डॉ. मुकुंद जयकर यांचे स्मृतिशिल्प विद्यापीठ आवारात बसवण्याबाबत डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी ठराव मांडला आहे. तर क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासनाची स्थापना करण्याबाबत डॉ. राजेंद्र घोडे यांनी, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळामार्फत गोदावरी संवर्धन प्रकल्प राबवण्याबाबत डॉ. राजेंद्र भांबर यांनी, विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक संघटना आणि विद्यापीठ यांची समन्वय समितीची स्थापना करण्याबाबत अमोल घोलप यांनी ठराव मांडला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule pune university pearl colour saree for female senate members pune print news ccp 14 zws
First published on: 10-03-2023 at 17:23 IST