पुणे : जनता वसाहतीतील कालव्यात पोहण्यासाठी उतरलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. चैतन्य विवेक किराड (वय १४, रा. रामोशी गेट, भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. चैतन्य आणि त्याचे मित्र शनिवारी जनता वसाहत परिसरातील कालव्यात पोहण्यासाठी गेले होते.
हेही वाचा >>> पुणे : राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल दाव्यात कसूर केल्याने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस
पोहण्यासाठी उतरलेला चैतन्य कालव्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी शोधमोहीम राबविली. सायंकाळी चैतन्य मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. उन्हाळ्यात कालव्यात अनेकजण पोहायला जातात. पोहताना खोलीचा अंदाज न येणे, तसेच दमछाक झाल्याने दुर्घटना घडतात, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.