पुणे : अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचे (नैर्ऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगालच्या उपसागरात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असून, मोसमी पाऊस चोवीस तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होणार असल्याने पुढील पाच दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडत असून, राज्यातील काही जिल्ह्यांतही विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असून तेथील कमाल तापमानाचा पारा ४५ ते ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. गुजरात, मध्य प्रदेशमध्येही तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत आह़े

बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र आणि निकोबारमध्ये नैर्ऋत्य मोसमी वारे २० ते २२ मेच्या आसपास दाखल होत असतात. मात्र, अनुकूल स्थितीमुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिली, तर केरळच्या किनारपट्टीवरही वेळेआधी नैर्ऋत्य मोसमी वारे दाखल होण्याची चिन्हे आहेत.

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, िहगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना १६ ते १९ मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो अ‍ॅलर्ट ) हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तविण्यता आली आहे.

चंद्रपूरचा पारा ४६.

विदर्भात तापमान तापमानवाढ कायम आह़े  चंद्रपूरमध्ये रविवारी ४६.८ अंश तापमानाची नोंद झाली़