जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मोसमी पावसाच्या हंगामात राज्यात सरासरीच्या तुलनेत २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोसळला असताना, मुंबई शहरासह कोकण विभागात अनेक भागांत मात्र सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, राज्याच्या सर्वच विभागांतील धरणांमध्ये यंदा ९० टक्क्यांहून अधिक आणि समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. देशात सरासरीच्या तुलनेत ६ टक्के अधिक पाऊस झाला असून, यंदा उत्तर भारत आणि ईशान्येकडील बहुतांश भाग पावसात मागे पडला आहे.

हेही वाचा- पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल जमीनदोस्त; रस्ता खुला होण्यास उशीर, वाहनांच्या लांब रांगा

Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…

यंदा १० जूनला नैर्ऋत्य मोसमी पावसाने तळकोकणमार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला आणि १६ जूनला तो राज्यव्यापी झाला. मात्र, बहुतांश भागात जून महिना कोरडा गेला. त्यामुळे पाण्याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यात सर्वदूर मोठ्या पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या अखेरीस राज्यात पावसाने सरासरी पूर्ण करून ती ओलांडली. हंगाम संपेपर्यंतच राज्यात पाऊस सरासरीच्या पुढेच राहिला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या कालावधीत काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले.

गतवर्षी मुंबईसह कोकण विभागात अधिक पाऊस झाला होता. मुंबई, पालघरने आघाडी घेत सरासरीच्या तुलनेत २० टक्के अधिक पावसाची नोंद केली होती. यंदा मात्र मुंबई शहरात पावसाची सरासरी पूर्ण झालेली नाही. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांनी पावसाची सरासरी काठावर पूर्ण केली आहे. विभागवार पावसामध्ये कोकण विभागात सर्वांत कमी सरासरीच्या तुलनेत ९ टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा २४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोसळलेल्या छताच्या दुरुस्तीचे काम सुरू

मुंबई शहर सरासरीत मागे

मुंबई उपनगरांमध्ये यंदा पावसाने सरासरी ओलांडून २६०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असली, तरी मुंबई शहरातील पाऊस मात्र सरासरीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी उणा आहे. राज्यात सर्वांत कमी पाऊस सांगली जिल्ह्यात १८ टक्के उणे झाला आहे. त्यापाठोपाठ मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात उणे ११ टक्के आणि विदर्भातील अकोल्यात सरासरीच्या तुलनेत ११ टक्के पाऊस कमी झाला आहे.

नाशिक, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत सर्वाधिक

राज्यात सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत तब्ब्ल ६१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत अनुक्रमे ५६ आणि ५४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. पुणे, नगर, धुळे, औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली यवतमाळ आदी जिल्ह्यांत ३० ते ४० टक्के अधिक पाऊस झाला आहे. ठाणे, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद आदी भागांतही पावसाचे प्रमाण चांगले आहे.

हेही वाचा- ‘बेस्ट’ची विजेवर धावणारी वातानुकूलित दुमजली बस लवकरच; पुण्यात चाचणी सुरू

ऑक्टोबरमध्येही जोरधारांचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने शनिवारी ऑक्टोबरमधील पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये देशात सरासरीच्या तुलनेत ११५ टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही काही भागांत जोरदार पाऊस होऊ शकतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.