पुणे : शिवशाही बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना स्वारगेट परिसरातील देशभक्त जेधे चौकात घडली. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कस्तुरीबाई रतनलाल राठोड (वय ७५) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिवशाही बसचालक करण प्रकाश बहादुर (वय ३२,रा. गार्निश बिल्डींग, आंबेगाव पठार, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राठोड यांची नात सोनाली रवींद्र पुजारी (वय ३३, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राठोड स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून निघाल्या होत्या. त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या राठोड यांनी शिवशाही बसने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या राठोड यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.