मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक असतानाही महापालिकेच्या अ श्रेणीतील अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने माहिती सादर करावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे: तीन प्रवाशांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण; अहवालाची प्रतीक्षा

महापालिका कायद्यानुसार महापालिकेच्या एक ते तीन श्रेणीतील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या मुख्य भवनात आणि पंधरा क्षेत्रीय कार्यालयात मिळून वीस हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार श्रेणी चारमधील कर्मचाऱ्यांना मालमत्ता विवरणपत्र सादर करणे बंधनकारक नाही. सध्या वर्ग दोन आणि तीन मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मालमत्ता विवरणपत्र सादर करण्यास सुरुवात झाली आहे. श्रेणी एक मधील अधिकाऱ्यांकडून मात्र ते देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मालमत्ता विवरणपत्र तातडीने सादर करण्यासंदर्भातील कार्यालयीन आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.