पुणे : पुण्यातील १७ वर्षीय तरुणीवर वडील आणि चुलत्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तर आजोबाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. वडील अजय (वय-४९) चुलता विजय (वय-३३) आणि आजोबा रामेश्वर (वय -७०) या तिघांविरोधात विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित तरुणी तिच्या मूळ गावी २०१६ ते २०१८ दरम्यान गेली होती. त्यावेळी तिच्यावर चुलता विजयने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले तर आजोबा रामेश्वरने तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती पीडित तरुणी पुण्यात कुटुंबियांसोबत राहण्यास आली तर वडील अजयने देखील तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला.

हेही वाचा: पुणे: उच्च शिक्षण संचालकपदी डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची नेमणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुटुंबातील व्यक्तीकडून तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांमुळे ती शांत राहायची. त्याच दरम्यान तिच्या महाविद्यालयात समुपदेशनचा कार्यक्रम होता. त्यावेळी तिने तेथील व्यक्तीला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आल्यावर,वडील, चुलता यांच्यावर बलात्कार आणि आजोबा यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यातील आरोपी वडील अजय याला अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश येथे टीम रवाना करण्यात येणार असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितले आहे.