पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उडान यांना अटक करण्यात आली. ॲड. पवार यांच्याविरुद्ध यापूर्वी सरकारी वकिलाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गेल्या वर्षी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे उघडकीस आले आहे.

वडगाव मावळ न्यायालयात सरकारी वकील ॲड. प्रेमकुमार अगरवाल यांना ॲड. रवींद्र पवार यांच्यासह तीन वकिलांनी गेल्या वर्षी मारहाण केली होती. याबाबत ॲड. अगरवाल यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. खटल्याची सुनावणी सुरू असताना वडगाव मावळ येथील न्यायालयीन कक्षात ॲड. अगरवाल यांना ॲड. पवार यांच्यासह तीन वकिलांनी मारहाण केली होती. ॲड. अगरवाल सरकारी वकील आहेत. गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाशिवाय साक्षीदार तपासण्यास ॲड. अगरवाल यांनी नकार दिला होता. त्यामुळे ॲड. पवार यांच्यासह तीन वकिलांनी न्यायालयीन कक्षात ॲड. अगरवाल यांना मारहाण केली होती.

हेही वाचा : भाजपा आमदार नितेश राणे यांनी घेतली गुंड शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट; म्हणाले, “त्यांनी हिंदुत्वासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहोळ खून प्रकरणात ॲड. पवार, ॲड. उडाण यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कोथरुड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. पवार यांनी मला न्यायालयात मारण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणात ॲड. पवार यांच्यासह तीन वकिलांनी अटकपूर्व जामीन मिळवला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी काय केला, याची मला माहिती नाही. मी ॲड. पवार यांच्यासह तीन वकिलांविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घेणार नाही. ॲड. पवार न्यायालयात वकिलांशी हुज्जत घालतात, असे असे सरकारी वकील ॲड. अगरवाल यांनी सांगितले.