पुणे: पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ‘एआय’ बाबतचे चर्चा सत्राचे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे.या चर्चा सत्राच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत.

तर २ जुलै २०२३ रोजी अजित पवार हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडत,महायुती सरकारमध्ये सहभागी झाले.या घटनेला जवळपास दोन वर्षाचा कालावधी होत आला आहे.पण या संपूर्ण कालावधीत शरद पवार,अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी सहभागी झाले तरी हे नेतेमंडळी बोलण्याच टाळत आले आहे.तर दुसर्‍या बाजूला मध्यंतरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेला जोर धरला होता.पण याबद्दल अद्यापपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील कोणत्याही नेत्यांनी एकत्र येण्याच्या चर्चाना अधिकृतपणे दुजोरा दिला नाही. त्या सर्व घडामोडी दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्या २६ वा वर्धापन दिन साजरा होत असून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार,तर बालेवाडी येथील स्टेडियम येथे अजित पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.त्या कार्यक्रमाकडे सर्वच राजकीय मंडळींच् लक्ष लागून राहिले आहे की,शरद पवार आणि अजित पवार पुढील राजकीय वाटचाली बाबत काय भूमिका मांडतात.पण हा कार्यक्रम सुरू होण्यास काही तास शिल्लक असताना शरद पवार आणि अजित पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार या दोघांची आसन व्यवस्था एकमेकांच्या बाजूलाच केली होती.मात्र अजित पवार हे व्यासपीठावर येताच, आसन व्यवस्था बदलून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी शरद पवार यांच्या बाजूला ठेवली.त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बाजूला बसण्याचे टाळले.