तळवडे येथे भीषण स्फोट होऊन आगीत होरपळून झाला होता मृत्यू

पिंपरी- चिंचवडमधील तळवडे येथे आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू झाला. यावरून आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अग्निकांडास जबाबदार असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.  तळवडे येथे दुपारी तीन च्या सुमारास विनापरवाना फॅक्टरीमध्ये केकवर लावण्यात येणारे आतिश बाजी करणारे कॅण्डल बनवण्याचा उद्योग राजरोसपणे चालू होता.

हेही वाचा >>> तळवडे दुर्घटना! ती भेट ठरली शेवटची…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज या फॅक्टरीमध्ये भीषण अशी आग लागली व त्या आगे मध्ये होरपळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, काही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने बऱ्याच ठिकाणी आशा अनधिकृत कंपन्या चालवल्या जातात. अग्निशामन विभागातर्फे देखील कोणाचेही या गोष्टींवर नियंत्रण नाही. छोटे- छोटे फटाका व्यवसाय रस्त्यावर फटाका विकताना ज्या परवानग्या काढल्या जातात त्यामध्ये प्रचंड अशी मानसिक आणि आर्थिक पिळवणूक त्या गोरगरीब होतकरू तरुणांची होत असते. परंतु, अशा प्रकारे अनाधिकृत फटाक्यांच्या कारखान्यावर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून होताना दिसत नाही. म्हणून मी आज महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त या दोघांना देखील चौकशी करण्यासंदर्भात मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांना ही विनंती असेल की लवकरात लवकर आपण चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून शहरांमध्ये पुन्हा अशा घटना घडणार  नाहीत. असही तुषार कामठे म्हणाले आहेत.