पुणे : पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या नियामक मंडळीची बैठक आज सकाळी १० वाजता होत आहे. ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. तर या नियामक मंडळावर अजित पवार,दिलीप वळसे पाटील,जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी संचालक म्हणून काम पाहत आहेत.
त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे ८.१० वाजता बैठकीच्या ठिकाणी आले आणि त्यावेळी अजित पवारांनी उपस्थित नागरिकांची निवेदन स्वीकारली.तर त्याच दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले.त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा देखील झाली.या दोघांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली.हे मात्र समजू शकले नाही.
तर या सर्व घडामोडी दरम्यान शरद पवार हे बैठकीच्या ठिकाणी ९ वाजून ४० मिनिटांनी आले. त्यावेळी दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि दिलीप देशमुख यांनी शरद पवार यांचे स्वागत केले.
पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आज होत आहे. अजित पवार हे केबिनमध्ये चर्चा करत होते. त्यावेळी शरद पवार यांनी केबिनमध्ये कोण आहे हे काही सेकंद पाहत पुढे जाणे पसंत केले. (व्हिडिओ क्रेडिट – लोकसत्ता टीम/सागर कासार) pic.twitter.com/pRXT4W9d3X
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) March 22, 2025
त्यानंतर शरद पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाहत म्हणाले,लवकर आलात का ? त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, हो साहेब म्हणाले, त्यानंतर शरद पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत काही अंतर पुढे चालत गेल्यावर, अजित पवार हे उपाध्यक्षच्या केबिनमध्ये बसले होते.त्या केबिनच्या जवळ पोहोचताच,दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्या केबिनचा दरवाजा उघडला.त्यावर अजित पवार हे आतमध्ये काही व्यक्तीसोबत चर्चा करित होते. तर त्या केबिनमध्ये कोण आहे. हे शरद पवार यांनी काही सेकंद पाहत पुढे जाणे पसंत केले.