…पण हे किर्लोस्कर यांचं अज्ञान आहे : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अनेक आठवणींना उजाळा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी बारामतीत शेतीविषयक प्रयोग आणि त्यातील किर्लोस्करांच्या योगदानाविषयी माहिती दिली. तसेच काहिशा मिश्किलपणे अतुल किर्लोस्कर जे बोलले ते त्यांचं अज्ञान असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच त्यांना या कामाच्या सुरुवातीला किर्लोस्करांनी दिलेल्या २०० इंजिनची आठवण करून देत कृतज्ञता व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले, “मघाशी बोलताना अतुल किर्लोस्करांनी इथल्या एका कामाला हातभार लावला असं सांगितलं. मात्र, हातभार हा फार छोटा झाला. त्यांनी आत्ता सांगितलं ते खरं आहे, पण हे त्यांचं अज्ञान आहे. कारण ५० वर्षांपूर्वी ज्यावेळी या संस्थेची स्थापना केली तेव्हा किर्लोस्करांनी २०० पंप दिले होते.”

“किर्लोस्करांनी ५० वर्षांपूर्वी केवळ ५० टक्के किमतीत २०० इंजिन दिले”

“आम्ही जेव्हा पाणी साठवायला लागलो तेव्हा साठवलेलं पाणी शेतात कसं न्यायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. त्यावेळी आमचे मित्र चंद्रकांत किर्लोस्करांशी बोलत असताना संतोषराव तिथं आले. त्यांनी काय चाललं, कशासाठी ही चर्चा अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी स्वतः बारामतीला येऊन पाझर तलावांची पाहणी केली. तसेच न मागता केवळ ५० टक्के किमतीत २०० इंजिन दिले,” असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “आम्ही २५-३० वर्ष उबवणी केंद्र उघडलं होतं, नको ती अंडी उबवली”, बारामतीत उद्धव ठाकरेंची टोलेबाजी!

शरद पवार अतुल किर्लोस्करांना म्हणाले, “किर्लोस्करांचं काम लहान आहे असं म्हणू नका. महाराष्ट्रात किर्लोस्करांचं योगदान प्रचंड आहे. त्याचा कधीही विसर पडू शकत नाही.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sharad pawar mention contribution of kirloskar in baramati and maharashtra development pbs