पंतप्रधान मोदी यांनी आज भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना दृकश्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी खास करुन शरद पवार यांच्यावर तसंच महाराष्ट्रातील विविध घोटाळ्यांचा संदर्भ देत विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे, असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल.

यावर शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. “पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे.शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला. मी कधी शिखर बँकेचा मेंबर नव्हतो.कर्ज कधी मी घेतले नव्हते. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. तेव्हा याबाबत बोलणे कितपत ठीक आहे ?. सिंचनाच्या बाबत त्यांनी वक्तव्य केलं मात्र ते खरे नाही ” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

हेही वाचा… “शरद पवारांच्या मुलीचं भलं…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, म्हणाले, “राष्ट्रवादीचा ७०,००० कोटींचा घोटाळा…”

हेही वाचा… “…त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार महाराष्ट्रात कुणीही नाही”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल!

शरद पवार पुढे म्हणाले “त्यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्यांचे काही कारण नाही, अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात, देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात, ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात, यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही.” असे खडे बोल पवार यांनी लगावले आहेत.