पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहराचा विकास अजित पवारांनी केला नाही. असं अप्रत्यक्षरीत्या शरद पवार यांनी सूचित केले आहे. शरद पवार हे पिंपरी -चिंचवड मध्ये संकल्प मेळाव्यामध्ये बोलत होते. पिंपरी- चिंचवड शहराचा विकास हा अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे यांच्यासह इतर नेत्यांनी केला आहे. शहराचा चेहरा बदलण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले आहे. गांधी आणि नेहरूंचा विचार देखील त्यांनी जोपासला असं मत शरद पवार यांनी व्यक्त केल आहे.

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आज शरद पवार यांनी पिंपरी- चिंचवड मध्ये मेळावा घेतला. पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा अस आवाहन यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. निवडणुकीची तुम्ही काळजी करू नका. आपण सगळ्या जागा लढवू, आपल्या सोबत जो कोणी, महिला, तरुण येत असेल त्यांचं स्वागत आहे. आपण त्यांना संधी देऊ, असं देखील यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी- चिंचवड शहरात सत्ताधाऱ्यांनी वाटण्या केल्या आहेत. इथला कारभार स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी आगामी महानगरपालिकेत संघटनात्मक काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नेतृत्व निवडून देण्यात यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. गेलेल्यांची चिंता करू नका. आपल्याला नवीन नेतृत्वाची फळी निर्माण करायची आहे. असं ही शरद पवार म्हणाले.