पुणे : महायुतीमध्ये शिरूरची जागा शिवसेनेलाच मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. मात्र, जो समोर पर्याय येईल, त्यानुसार राजकारण करावे लागेल. मी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवावी किंवा कसे, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील, अशा शब्दांत माजी खासदार, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची अप्रत्यक्ष कबुलीच गुरुवारी दिली.

हेही वाचा >>> राज्यातील शाळांमध्ये २ ते ४ एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन;  पाचवी, आठवीची स्वतंत्रपणे वार्षिक परीक्षा

Supriya Sule, polling,
मतदानाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
Solapur, vote, temperature, BJP,
सोलापूर : वाढत्या तापमानात मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान; भाजपच्या प्रतिष्ठेची, तर काँग्रेस व शरद पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई
Solapur lok sabha, solapur, political party,
सोलापूर : कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा ? विविध समाजामध्ये विभागणी
mahayuti, Maval, team, Delhi
मावळमध्ये महायुतीत अस्वस्थता? दिल्लीहून सहा जणांचे पथक दाखल
political parties candidates show power on occasion of filing nomination papers and campaigns
उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन आणि प्रचारफेऱ्यांचा धडाका
Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
ajit pawar NCP, Nashik Lok Sabha Seat, lok sabha 2024, NCP Seat Demands Allocation in mahayuti, nashik lok sabha 2024, lok sabha 2024, bjp, eknath shinde shivsena, chhagan bhujbal,
नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क – अजित पवार गटाचा ठराव
Eknath Shinde Raj Thackeray (1)
“दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात…”, मनसेचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “महाराष्ट्रद्रोही अन् भ्रष्टाचारी…”

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाच्या ऑनलाइन सोडतीच्या प्रारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आढळराव म्हणाले, ‘महायुतीमध्ये शिरूरची जागा शिवसेनेला मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी मला दिला आहे. त्यानुसार ही जागा शिवसेनेलाच मिळेल. मात्र, जो समोर पर्याय येईल, त्यानुसार राजकारण करावे लागेल. मी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवावी की नाही, याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील. मी त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. गेली पाच वर्षे मतदारसंघात फिरलो आहे. काम केले आहे. मतदारसंघातील अनेक कामे खासदार नसतानाही मार्गी लावली आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. माझ्या उमेदवारीची केवळ चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारीला विरोधाचा प्रश्नच येत नाही. माझ्या उमेदवारीला राष्ट्रवादीकडून विरोध होत असल्यास तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे.’ दरम्यान, मंचर येथील विविध शासकीय कार्यक्रमांना शासकीय निमंत्रणावरून मी हजेरी लावली होती. महायुतीतील एक घटक पक्ष असल्याने उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या वाहनातून एकत्र प्रवास केला. त्यात वावगे असे काही नाही. महाविकास आघाडीत असताना राष्ट्रवादीने आगळीक केली होती, म्हणून तेव्हा विरोध केला होता. आता तशी परिस्थिती नाही, असेही आढळराव यांनी सांगितले.