पिंपरी : भरधाव वेगातील जेसीबीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी मोशीतील गोडाऊन चौक येथे घडली.ऋषिकेश जयदेव खराडे (सहा वर्षे, रा. मोशी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. त्याच्या मावशीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल श्रीरामचंद्र यादव (२६, मोहननगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या बहिणीचा मुलगा ऋषिकेश हा मोशीतील गोडाऊन चौक येथील भाजीवाल्याकडे गेला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या जेसीबीने ऋषिकेश याला जोरात धडक दिली. त्यामुळे ऋषिकेश गंभीर जखमी झाला होता.