पिंपरी : शांताबाईंच्या काव्यात महाराष्ट्राचा गोडवा आणि शालीनता होती. नद्यांना उपनद्या मिळाव्यात, तसे काव्याचे सर्व प्रकारचे रस त्यांच्या गीतलेखनात मिसळले. महाराष्ट्राची चंद्रभागा होण्याइतके योगदान त्यांनी दिले, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ झाला. ‘बकुळगंध’ या जन्मशताब्दी ग्रंथाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, संगीतकार अशोक पत्की, कवी रामदास फुटाणे, डॉ. पी. डी. पाटील, गिरीश प्रभुणे, प्रा मिलिंद जोशी, उल्हास पवार, सुधीर गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शांता शेळके यांच्या कुटुंबातील सुलभा कोष्टी, रेवती संभारे, मीना शेळके यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा >>> वैद्यकीय कारणांनी भारतात आलेल्या परदेशी नागरिकांच्या संख्येत दुप्पट वाढ; ‘इंडिया टूरिझम २०२२’ अहवालातील निष्कर्ष

हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीपाल सबनीस म्हणाले की, शांता शेळके यांच्या गीतलेखनात शब्द -सुरांचा संगम झाल्याचे दिसून येते. शांताबाई सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतिक आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेणारा ‘ बकुळगंध ‘ हा ग्रंथ महत्वाचा ठेवा आहे. रामदास फुटाणे म्हणाले की, कविता, लोकसंगीताबद्दलचे शांताबाईंचे ज्ञान, तरलता वाखाणण्यासारखी होती. प्रास्तविक राजन लाखे यांनी केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. नीता ऐनापुरे यांनी आभार मानले.