पुण्यातील भिडे वाड्यात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. १८४८ मध्ये त्यांनी ही शाळा सुरु केली. मात्र या शाळेची अवस्था सध्या बघवत नाही अशीच आहे. जिथे नजर जाईल तिथे धुळीचं साम्राज्य आणि पडझड. भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी शाळा सुरु केली हा इतिहास आहे. मात्र वाडाही इतिहासजमा झाला आहे असंच ही अवस्था मूकपणे सांगते आहे. पाहुयात या भिडे वाड्याचं वास्तव दाखवणारा हा खास व्हिडीओ