पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२२ या कालावधीत शहरातील विविध मैदाने, जलतरण तलाव, क्रीडासंकुले, शाळांच्या परिसरात या स्पर्धा पार पडणार आहेत.

हेही वाचा >>> पुणे: विद्यार्थ्यांना शुल्क परतावा न केल्यास कारवाई; यूजीसीचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी ही माहिती दिली. १४, १७ व १९ अशा वयोगटातील मुले व मुलींसाठी या स्पर्धा होणार आहेत. सुमारे ४९ खेळ प्रकारांचा या क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश आहे. प्रामुख्याने क्रिकेट, टेबल टेनिस, बुद्धिबळ, फुटबॉल, कराटे, तलवारबाजी, किक बॉक्सिंग, बास्केटबॉल, योगासन, रायफल शुटींग, बॉक्सिंग, खो खो, हॉलीबॉल, लॉनटेनिस, बॅडमिंटन, स्केटिंग, जलतरण, मल्लखांब, कॅरम, वेट लिफ्टिंग, नेटबॉल, मार्शल आर्ट, शालेय हॉकी, सायकलिंग, सॉफ्टबॉल, बॉल बॅडमिंटन, तायक्वांदो, बेसबॉल, रग्बी, कुस्ती- फ्रीस्टाईल, ज्युडो, कबड्डी, सॉफ्ट टेनिस, रोल बॉल, धनुर्विद्या आदी खेळांचा समावेश आहे. पै.मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, डॉ.हेडगेवार क्रीडा संकुल, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, संजय काळे मैदान, ज्ञानप्रबोधीनी नवनगर विद्यालय आदी ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत.