पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ४ प्रवाशी मृत झाले असून १५ प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास माळवाडीजवळ हा भीषण अघात झाला. सूत्रांकडून मिळालेल्या  प्राथमिक माहितीनुसार,  एसटी महामंडळाची एमएच-१४ बीटी-३४९२ शिरुर-कुर्ला ही बस कुर्लाच्या दिशेला जात होती. त्यावेळी समोरुन येणा-या युपी-७८ सीटी ११२५ या क्रमांकाच्या ट्रकने बसला समोरा सरमोर जोरदार धडक दिली. या अपघातामधील जखमींना  पायोनीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत झालेल्यांची अद्याप ओळख पटली नसून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असून दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी मदत कार्य सुरु आहे.