scorecardresearch

Premium

देहू-आळंदी-पंढरपूरला अत्याधुनिक बसस्थानके, राज्य सरकारने घेतला हा निर्णय

राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येणार आहे.

State of the art bus stations
देहू-आळंदी-पंढरपूरला अत्याधुनिक बसस्थानके, राज्य सरकारने घेतला हा निर्णय (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येणार आहे. तसेच त्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्यात येणार आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधाही तयार करण्यात येणार आहे.

मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे आदेश दिले. तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी
tourist vehicles blocked the path of the tiger in the Tadoba-Andhari tiger project buffer zone
Video : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पर्यटक वाहनांनी अडवली वाघाची वाट
farmers in drought affected areas
राज्यातील दुष्काळग्रस्त भागामधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दहा पटीने वाढ, ग्लोबल विकास ट्रस्टची उल्लेखनीय कामगिरी
Investment growth potential due to aviation services in Gondia
उद्योग, आरोग्यसेवेत सुधारणा, कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज; गोंदियामध्ये विमानसेवेमुळे गुंतवणूक वाढीची शक्यता

हेही वाचा – एमपीएससी उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी… मुलाखतीच्या टप्प्यावर वैद्यकीय चाचणीच्या निर्णयात बदल

हेही वाचा – पुणे : अजित पवारांचा चाकणच्या हद्दवाढीसाठी पुढाकार

तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी. देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येईल. त्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्यात येणार असल्याचेही पवार यांनी बैठकीत सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: State of the art bus stations at dehu alandi pandharpur this decision was taken by the state government pune print news psg 17 ssb

First published on: 28-11-2023 at 22:08 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×