scorecardresearch

Premium

पुणे : अजित पवारांचा चाकणच्या हद्दवाढीसाठी पुढाकार

पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत.

limit of Chakan
पुणे : अजित पवारांचा चाकणच्या हद्दवाढीसाठी पुढाकार (संग्रहित छायाचित्र)

पुणे : पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर आणि परिसराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यामध्ये ही सूचना केली. चाकण शहराची हद्दवाढ करण्याची मागणी स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. त्यावर हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना पवार यांनी या वेळी केली.

Notices to more than 200 developers in Nashik who did not give 20 percent of MHADAs share of houses in scheme
म्हाडाच्या हिश्श्याची २० टक्के योजनेतील घरे न देणाऱ्या नाशिकमधील दोनशेहून अधिक विकासकांना नोटिसा
farmers in drought affected areas
राज्यातील दुष्काळग्रस्त भागामधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दहा पटीने वाढ, ग्लोबल विकास ट्रस्टची उल्लेखनीय कामगिरी
Investment growth potential due to aviation services in Gondia
उद्योग, आरोग्यसेवेत सुधारणा, कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज; गोंदियामध्ये विमानसेवेमुळे गुंतवणूक वाढीची शक्यता
Permanent Account Number to prevent fake number of students in schools
कल्याण : शाळांमधील खोटी पटसंख्या रोखण्यासाठी ‘पेन’चा आधार

हेही वाचा – कोथिंबीर, मेथी कवडीमोल; घाऊक बाजारात जुडीला २ ते ७ रुपये

हेही वाचा – एमपीएससी उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी… मुलाखतीच्या टप्प्यावर वैद्यकीय चाचणीच्या निर्णयात बदल

चाकण एमआयडीसीकडे ४२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची मागणी येत आहे. परिसरातील सहा ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असून ३० एमएलडी पाणी शिल्लक आहे. प्रस्तावित नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेऊन उर्वरित पाणी गावांत पिण्यासाठी द्यावे. चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही नगरपरिषदेचे घनकचरा संकलन प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर आहेत. यापुढे केवळ घनकचऱ्यावर प्रक्रिया न करता या प्रकल्पांमधून वीज, गॅस, बांधकामासाठीचे साहित्य यासारखे उत्पादन घेणारे प्रकल्प राबवावेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar initiative to increase the limit of chakan pune print news psg 17 ssb

First published on: 28-11-2023 at 21:44 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×