पुण्यात सावत्र वडिलांकडून मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे बलात्कार

Rape a young lady in pune, Woman allegedly raped in Pune,rape, बलात्काराचा प्रयत्न,
प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा परिसरात एका बांधकामाच्या साईटवर काम करणाया सावत्र वडिलांकडून १० वर्षीय मुलीवर ३ वर्षापासून बलात्कार करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे. हडपसर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हडपसरमधील मगरपट्टा भागात ५ वर्षांपासून पीडित मुलीची आई आणि सावत्र वडील एका बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करतात. पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने पीडित मुलीच्या आईने घटस्फोट घेतला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने एका व्यक्तीशी लग्न केले. त्याच्याकडून तिला दोन मुली झाल्या आहे. दरम्यानच्या कालावधीत महिेलेच्या दुसऱ्या पतीने सावत्र मुलीवर जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केले.

पीडित मुलीच्या आईला या कृत्याची माहिती ४ महिन्यांपूर्वी समजली होती. मात्र तिनेदेखील भीतीपोटी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली नाही. बांधकामाच्या ठिकाणी जाताना पीडित मुलीला पाळणाघरात ठेवले जात होते. तिथे पीडित महिलेच्या काही मैत्रिणी झाल्या. त्यापैकी एका मैत्रिणीला तिने सर्व प्रकार सांगितला. मग याची माहिती पाळणघर चालवणाऱ्या व्यक्तीला समजताच पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपी अटक केली असून पुढील आधिक तपास करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stepfather arrested for raping minor stepdaughter in pune

ताज्या बातम्या