राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात येत आहे.

हेही वाचा- पुण्यात नऱ्हे भागात भंगार मालाच्या गोदामास आग

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत

यावेळी काँग्रेस पक्षाचे सहकार प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे म्हणाले की, राज्यातील अनेक भागात लाखो विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करीत असतात. त्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना. २०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे तो नियम २०२५ पासून लागू करावा अशी आमची राज्य सरकार आणि आयोगाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील या प्रश्नावर आम्ही आंदोलन केले आहे. आता आम्ही मागे हटणार नसून विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय होत नाही.तोवर आम्ही अलका टॉकीज चौकात जाणार नाही, असा इशारा राज्य सरकारला त्यांनी दिला