पुणे : पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि परिसराला रविवारी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागली.

हेही वाचा – आठवडाभर राज्यात सर्वदूर दमदार सरी? ऐन सुगीत शेतीमाल मातीमोल होणार?

हेही वाचा – सिद्धेश कदम यांच्या मर्सिडीज भेटीचे गौडबंगाल! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या दाव्यात विसंगती; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी चिंचवडसह परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली. दहा पंधरा मिनिटांतच ढगांचा गडगडाट होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. जोरदार वारे, मुसळधार पावसाचा मारा सुरू असल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पावसाने झोडपून काढल्यामुळे रविवारी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली. शहरात सखल भागात पाणी साचले होते. पुणे शहरासह येरवडा, विमान नगर, सहकार नगर, कोथरूड सिंहगड रोड परिसरात जोरदार पाऊस झाला. पिंपरी चिंचवड शहरासह बाणेर, दिघी परिसरात जोरदार पाऊस झाला