पिंपरी चिंचवड : उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदारांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार हुकूमशाही प्रवृत्तीने लादण्याचा प्रयत्न केला. ज्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हातात भगवा झेंडा घेऊन स्वाभिमान, हिंदुत्वाचा विचार शिकवला. त्याच पक्षातील आमदार, खासदारांना जय सोनिया गांधी, जय राहुल गांधी, जय शरद पवार हे शिकवण्याचा प्रयत्न केला तो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे शिवसेनेवर अशी परिस्थिती आली आहे. असे वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यासोबत गेले. सोनिया गांधी यांना वाकून नमस्कार करत होते, ते पाहून आम्हाला वाईट वाटले . शिवसेनेवर प्रेम करणारा भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला दुःख झाले. हे सोनिया गांधी यांना झुकून नमस्कार करतात हे विचित्र दृश्य अवघा महाराष्ट्र हे पाहत होता. शिवसेना पक्षाच वाईट होणे किंवा शिवसेना पक्षाची मान्यता, बोध चिन्ह जाणे याचा आम्हाला आनंद नाही तर दुःख झाले आहे .त्यांच्या मनात भाजप बद्दल राग आहे पण, आमच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, ती आज ही आहे आणि उद्याही राहील असे मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा : आता ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ नावावरुन शिंदे आणि ठाकरेंमध्ये वादाची शक्यता; मात्र हे नाव ठाकरेंना मिळण्याची शक्यता अधिक कारण…

पुढे ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आग ओकण्या ऐवजी उद्धव ठाकरे यांनी आत्ता ही सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की , ज्या दिवशी काँग्रेस सोबत जावे लागेल त्या दिवशी दुकान बंद करेन . तुम्ही तर हे ऐकले नाही आणि तुम्ही काँग्रेससोबत गेलात मग तुमचे दुकान सच्चे शिवसैनिक पूर्ण करत असतील तर मग आता पत्रकार परिषदा घेऊन काय फायदा असे देखील मुनगंटीवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar criticizes uddhav thackeray shivsena congress ncp pimpri chinchwad tmb 01 kjp
First published on: 10-10-2022 at 09:53 IST