scorecardresearch

पुणे : उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या; पत्नीपाठोपाठ पतीची आत्महत्या

पत्नीने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने पतीने आत्महत्या केल्याने भाेर तालुक्यातील केळवडे परिसरात शाेककळा पसरली.

Suicide newly married couple
उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या; पत्नीपाठोपाठ पतीची आत्महत्या (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : साडेतीन महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधलेल्या उच्चशिक्षित दाम्पत्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली. पत्नीने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने पतीने आत्महत्या केल्याने भाेर तालुक्यातील केळवडे परिसरात शाेककळा पसरली.

समृद्धी धीरज कोंडे (वय २२), धीरज संभाजी कोंडे (वय २९, दोघे रा. केळवडे, ता. भोर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. समृद्धी ढमालेचा डिसेंबर महिन्यात बावधन येथे धीरज कोंडे याच्याशी विवाह झाला होता. धीरजला कृषी शाखेची पदवी मिळाली होती. समृद्धीने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला होता. आठ दिवसांपूर्वी समृद्धी बावधन येथे माहेरी गेली होती. तिने मंगळवारी (२८ मार्च) पिरंगुट येथे मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा – RSS, भाजपाची विचारसरणी महिलांच्या विरोधात, म्हणूनच महिलांबद्दल खालच्या पातळीवर बोललं जातं- प्रणिती शिंदे

हेही वाचा – पुणे : रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’; पुण्यात कोरेगाव पार्क परिसर सर्वांत महागडा, प्रभात रस्त्याचे दुसरे स्थान कायम

पत्नीने आत्महत्या केल्यानंतर धीरजला धक्का बसला. त्यानंतर त्याने गुरुवारी (३० मार्च) केळवडेतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांच्या अंतराने नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर भोर तालुक्यात शोककळा पसरली. दोघांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 15:24 IST

संबंधित बातम्या