बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वी आज सकाळी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली. त्यावेळी आजी माजी पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

गणपती बाप्पाकडे काय मागितले त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, राज्यात लोकसभा निवडणुका होत असून त्या चांगल्या वातावरणात पार पाडाव्यात, राज्यात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी प्रार्थना गणराया चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

What Ajit Pawar said?
अजित पवार स्पष्टच बोलले, “काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं आणि मी कपाळावरच हात मारला”
Controversial statements of Deputy Chief Minister Ajit Pawar again
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये; तीव्र प्रतिक्रिया उमटताच सारवासारव
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
man beats wife with baseball bat
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून पतीचा पारा चढला; बेसबॉल बॅटनं केली मारहाण; गुन्हा दाखल

हेही वाचा – पूर्वप्राथमिक शिक्षण बोलीभाषेत; ‘एनसीईआरटी’कडून देशभरात ५४ अभ्यासक्रम

आज सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यातून शक्तिप्रदर्शनाचे प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही. महायुतीच्या उमेदवाराचे अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी उपस्थित राहत आहे. अर्ज दाखल केला जाणार आहे, त्यामुळे शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही. महायुतीमधील प्रत्येक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे एवढेच आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस आणि तुमच्या दोघांमध्ये काल रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात काल रात्री ९ ते १० यावेळेत बैठक झाली. त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा देखील झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्या विधानाचा ‘ध’ चा ‘मा’ करू नये : अजित पवार

मी तुम्हाला निधी देतो, कचा कचा बटन दाबा असे विधान तुम्ही केले आहे. त्यावरून विरोधक टीका करित आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, परवा राहुल गांधी काय म्हणाले, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ‘ध’ चा ‘मा’ करू नये. मी त्या ठिकाणी गमतीने हसत हसत म्हणत होतो. त्या ठिकाणी डॉक्टर, वकील मंडळी होती. तसेच जाहीरनाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे ती प्रलोभन झाली का ? त्यामुळे मागील उमदेवारापेक्षा अधिक चांगले काम करू आणि अधिक निधी देऊ हे सांगायचा प्रयत्न केला आहे. तसेच विकास कामांसाठी आमदार, खासदार निधी उपलब्ध करून देतात ना, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

हेही वाचा – ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन

गणपती बाप्पाकडे काय मागितले या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मागील काही महिन्यांपासून बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी नागरिकांची भेट घेत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी नागरिक मोठ्या उत्साहात स्वागत करीत आहे. माझ्याशी संवाद साधत आहे आणि आज बारामती लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करीत आहे, त्यामुळे आमच्या दृष्टीने आजचा दिवस खूप मोठा आहे. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि आरती देखील केली. जनसामन्यांची सेवा करण्याची संधी मिळू दे आणि मोठा विजय मिळू दे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली